We organize various events throughout the year to foster networking, knowledge sharing, and collaboration among our members. Stay tuned for upcoming events and join us to connect with industry professionals and experts.
* "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" * *डॉक्टर्स डे निमित्त निहा कोल्हापूरचा पर्यावरण संवर्धनाचा सुंदर उपक्रम! * *दि. १ जुलै २०२६ रोजी डॉक्टर्स डे निमित्त निहा (NIHA) कोल्हापूर यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या संत तुकाराम महाराजांच्या विचाराला साकार करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.* *या उपक्रमास निहा कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. सचिन भादवणकर, उपाध्यक्ष डॉ. चेतन गुरव, सचिव डॉ. तुषार पांडव, खजिनदार डॉ. रायसिंग चव्हाण, माजी अध्यक्ष डॉ. शितल पाटील-वसगडेकर, संस्थापक . डॉ. हर्षवर्धन जगताप, कायदे सल्लागार डॉ. दीपक पोवार, क्रीडा सचिव डॉ. राहुल घोलप, कार्यकारिणी सदस्य डॉ. मंजुषा मोरे, डॉ. प्रिया पाटील तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.* *यावेळी उपस्थित सर्वांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी जपण्याचा संकल्प केला. वृक्ष लागवड ही केवळ आजची गरज नसून, येणाऱ्या पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.* * "वृक्ष लावा... भविष्यासाठी जीवन वाचवा!" * *निहा कोल्हापूर* *"आरोग्यासोबत पर्यावरणाच्या संवर्धनासाठीही सदैव कटिबद्ध."*
Learn More
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि बहुजन कल्याण यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, आरक्षणाचे जनक, दीन-दुबळ्यांचे कैवारी आणि पुरोगामी विचारांचे अध्वर्यू राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.
त्यांचे विचार, कार्य आणि समाजोन्नतीची तळमळ आपल्याला सदैव प्रेरणा देत राहो, हीच कृतज्ञ अभिवादनातून अपेक्षा.
"बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या त्यांच्या महान विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प करूया.
आज दिनांक २६ जून २०२६ रोजी न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन (NIHA), कोल्हापूरतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी NIHA कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. सचिन भादवणकर सर, माजी अध्यक्ष डॉ. शितल पाटील-वसगडेकर सर, संस्थापक डॉ. हर्षवर्धन जगताप सर, सचिव डॉ. तुषार पांडव सर, खजिनदार डॉ. रायसिंग चव्हाण सर, कायदे सल्लागार डॉ. दिपक पोवार सर तसेच कार्यकारिणी सदस्या डॉ. मंजुषा मोरे मॅडम उपस्थित होत्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना यांना विनम्र अभिवादन!
NIHA KOLHAPUR & JANAKI HOSPITAL CME 2026 Continuing Medical Education (CME) Program Date: 21 June 2026 (Sunday) Venue: Hotel Ayodhya, Kolhapur
Learn More